Skip to Content

कुक्कुटपालनातील आजारांपासून मुक्त होण्याचे पाच मार्ग

पोल्ट्री फार्म स्वच्छ ठेवणे हे रोग टाळण्यासाठी पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.
13 December 2025 by
Shriganesh Sathe
| No comments yet

प्रस्तावना


जर तुम्हाला पोल्ट्री व्यवसायात यश मिळवायचं असेल, तर कोंबड्यांचं स्वास्थ्य खूप महत्त्वाचं आहे. आजार हे पोल्ट्री शेतकऱ्यांसाठी एक मोठा त्रास बनले आहेत. अगदी एक छोटासा संसर्गही संपूर्ण कळपावर परिणाम करु शकतो, त्यामुळे मेहनतीने उभारलेलं तुमचं व्यवसाय काही दिवसांतच अडचणीत येऊ शकतं. योग्य काळजी, स्वच्छता आणि नियोजन यांद्वारे बहुतेक पोल्ट्री आजार टाळता येऊ शकतात. या ब्लॉगमध्ये आपण पोल्ट्री आजार टाळण्यासाठी 5 सोप आणि प्रभावी पावले पाहणार आहोत.


1️⃣ स्वच्छता हेच खरे संरक्षण :

पोल्ट्री फार्म स्वच्छ ठेवणं हे आजार टाळण्याचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. शेड रोज स्वच्छ ठेवा, ओले किंवा घाणेरडे litter त्वरित बदलून टाका. पिण्याच्या भांड्या आणि खाद्य ट्रे रोज धुवा.
बाहेरून येणाऱ्या लोकांचं आणि वाहनांचं अनावश्यक ये-जा कमी करा.

उदाहरण: अस्वच्छ शेडमध्ये कॉक्सिडिओसिस आणि बॅक्टेरियल संसर्ग लवकर पसरतो.

2️⃣ लसीकरणाचा समय :

1]लसीकरण म्हणजे आजारांपासून होणारी एक तयारी.
2]पिल्ले आल्यावर ठरावीक वेळापत्रकानुसार लसी द्या.
3]Marek’s, Ranikhet, Gumboro सारख्या आजारांसाठी लस घेतल्यास खूप फायदा होतो.
4]लसीकरणाची नोंद करून ठेवा. 

लक्षात ठेवा: आजार झाला की उपचार महाग असतात, पण लसीकरण स्वस्त आणि सुरक्षित आहे.

3️⃣ दर्जेदार खाद्य आणि स्वच्छ पाणी :

1]कमकुवत पोषणामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते.
2]नेहमी ताजं, दर्जेदार आणि संतुलित खाद्य वापरा.
3]बुरशी लागलेलं किंवा जुने खाद्य देऊ नका.
4]पाण्याची गुणवत्ता स्वच्छ आणि निर्जंतूक असावी. 

उदाहरण: खराब खाद्यामुळे लिव्हर व पचनाशी संबंधित आजार होऊ शकतात.

4️⃣ आजारी पक्ष्यांना अलग ठेवा :

1]एका आजारी कोंबडीमुळे संपूर्ण कळप धोक्यात येऊ शकतो.
2]आजारी, सुस्त किंवा वेगळं वागणारे पक्षी त्वरित वेगळे करा.
3]शक्य असल्यास पशुवैद्यांचा सल्ला घ्या.
4]मृत पक्ष्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट करा.

फायदा: रोगाचा प्रसार लवकर थांबतो.



5️⃣ नियमित निरीक्षण आणि सल्ला :

1]दररोज कोंबड्यांचं निरीक्षण केल्यास आजार लवकर लक्षात येतो.
2]खाणे-पिणे, हालचाल, विष्ठा यावर लक्ष ठेवा.
3]वजन, वाढ आणि अंडी उत्पादन तपासणं आवश्यक आहे.
शंका असल्यास तज्ज्ञांचा सल्ला त्वरित घ्या. 

सूचना: लवकर ओळख = कमी नुकसान.


निष्कर्ष

पोल्ट्री आजार टाळणं अगदी शक्य नसले तरी योग्य काळजी घेतल्यास त्याचं प्रमाण नक्कीच कमी करता येतं. स्वच्छता, लसीकरण, योग्य खाद्य, वेगळं ठेवणं आणि नियमित निरीक्षण या पाच पावलांचे पालन केल्यास तुमचा पोल्ट्री व्यवसाय सुरक्षित आणि फायदेशीर राहील. आजच हे उपाय अमलात आणा आणि निरोगी कळपाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका.

Shriganesh Sathe 13 December 2025
Share this post
Archive
Sign in to leave a comment
पोल्ट्री फार्म नष्ट करणारे आजार
Marek's   Disease